व्हिजन -: 

विज्ञानाच्या क्षेत्रात जिज्ञासा, टीकात्मक विचार आणि सर्जनशीलता वाढवणारे व्यासपीठ देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक चौकशी आणि नावीन्यतेची आवड निर्माण करणे.

      मिशन -:

विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी, वैज्ञानिक कल्पनांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारी आणि उत्कृष्ट कामगिरी ओळखणारी विज्ञान स्पर्धा आयोजित करणे, कठोर आणि आकर्षक स्पर्धेद्वारे, वैज्ञानिक आणि संशोधकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणे, शैक्षणिक वाढीस समर्थन  देणे आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या प्रगतीमध्ये योगदान देणे हे आमचे ध्येय आहे. 

बक्षिसांचे स्वरूप -:

  1. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांमधून शिक्षण मंडळ नुसार राष्ट्रीय पातळीवर प्रथम ३ विद्यार्थ्यांना  ५००० रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
  2. राज्यस्तरीय परीक्षेस (दुसऱ्या फेरीस) पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रू.५०० आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
  3. जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा परिक्षेचा निकाल २० दिवसांच्या यात कळविण्यात येईल आणि पुढील फेरीत निवडले जाणाऱ्या विद्यार्थ्याना कळवले जाईल.
परीक्षेचे स्वरूप -:
 
  1. ऑनलाईन प्रश्न मंजुषा  -: गट १- ५वी, ६वी ; गट २-७वी ८वी;            गट ३-९वी – १०वी ; अश्या ३ गटात घेतली जाईल.
  2. प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागीहोण्यासाठी परीक्षा शुल्क १०० रू असेल. एकदा भरलेले शुल्क कुठ्ल्याही परिस्थितीत परत  मिळणार नाही.
  3. परीक्षा ही मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी भाषेत घेण्यात येईल.

परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येईल.

  • प्राथमिक फेरी (ऑनलाईन प्रश्न मंजुषा)
  • द्वितीय फेरी (लेखी व प्रयोग परिक्षा)
  • अंतिम फेरी (मुलाखत)

 

प्राथमिक फेरी  :

  1. प्राथमिक फेरी ही वस्तू निष्ठ स्वरूपाची असेल.
  2. सर्व जिल्ह्यातून विदयार्थी घरबसल्या त्यांच्या मोबाईल वरून ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन प्रॉकटोर पद्धतीने देतील.
  3. कुठल्याही पद्धतीने गैर वर्तन झालेले आढल्यास विद्यार्थी सिस्टीम कडून बाद केला जाईल.
  4. परीक्षेचे सर्व अधिकार हे कमिटी कडे अबाधित असतील.

प्राथमिक फेरी म्हणजेच ऑनलाईन प्रश्नमंजुषा खालील तारखांना -:

17 नोव्हेंबर 2024 – ग्रुप १ -५वी,६वी, ग्रुप २- ७वी, ८वी

28 नोव्हेंबर 2024-  ग्रुप ३ ९वी,१०वी  रोजी घेतली जाईल

प्रश्न -१००| मार्क्स -१००| वेळ – ६० मिनिटे 

द्वितीय फेरी आणि अंतिम फेरी :

  1. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्याना द्वितीय फेरीसाठी बोलावले जाईल. द्वितीय आणि अंतिम फेरी एकाच दिवशी घेण्यात येईल.
  2. सदर प्रॅक्टिकल तसेच मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण जे जिल्हानिहाय वेगवेगळे असेल ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक फेरीचा निकाल आल्यावर एक आठवड्यात त्यांच्या मुख्याध्यापक आणि पालकांना कळवला जाईल.

 

अभ्यास क्रम :

  1. मागील इयत्तेतील विज्ञान पाठ्यपुस्तक आणि सध्या अभ्यास करत असलेले विज्ञान पाठ्यपुस्तक. 
  2. विज्ञान जगतातील चालु घडामोडी

Syllabus : 

  1. Science textbook of currently studying and previous grade / standard.
  2. Current Affairs related to science

 

HELPLINE NO : 9321443526
E-mail-id: littlescientistsf@gmail.com

Form Link .

click here.